Homeक्राईमअबब ! पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला.

अबब ! पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला.

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला

विधानसभा निवडणुकीसमोर पोलिसांची मोठी कारवाई

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। पुणे :

पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत दि. 25 ऑक्टोबर रोजी 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच दि. 25 रोजी पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे.
1

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी एक टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.  संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे. 

सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी या संदर्भात सर्व माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो जमा करण्यात आलेला आहे. 

  1. ↩︎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img