
आंतरराष्ट्रीय अॅबॅकस, वेदिक स्पर्धेत शिव अकॅडमीची यशस्वी भरारी
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
चॅम्पियंस-11 आंतरराष्ट्रीय अॅबॅकस व वेदिक स्पर्धा दि. 21/12/2024 रोजी अमरावती येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण दि. 22 डिसेंबर रोजी बिरला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कुल, रेवासा, अमरावती येथे पार पडले. या स्पर्धांमध्ये शिव अकॅडमीच्या यवतमाळ व बाभूळगाव शाखेतून एकुण 65 विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये सहभागी असलेल्या 15 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून ग्रॅन्ड मास्टर अवार्डचे मानकरी ठरले. 44 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला, 9 विद्यार्थी व्दितीय तर 4 विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. याषिवाय परिनिता दुबे ही वेदिक मॅथमध्ये व्दितीय ठरली. तसेच 5 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून सन्मानित करण्यात आले. शिव अकॅडमीच्या संचालीका सौ. रोशनी संगित काळे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्ट फ्रेन्चाईसी अवार्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अॅबॅकस व वेदिक मॅथ अश्या दोन प्रकारांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.
प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रॅन्ड मास्टर अभिश्री खसाळे, आनंदी कापसे, अनुश गडपायले, आरुषी जिरकर, अथर्व चौधरी, देवांशी वाढई, हेरंब गरोडी, क्रिष्णा गिरी, मयुर कठाळे, परिनिता दुबे, पार्थ दळवी, पूनम वांढरे, सारा हेमने, श्रीया मिसाळ, तन्मय नक्षणे यांचा समावेश आहे. तर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी अरिश शेख, अर्नव देशमुख, देवेश वाढई, धनश्री चिंटे, हर्षदीप पाटील, कौशल्य इखार, क्रिष्णा देवरे, क्रिष्णा पारधी, नमन बाडे, नंदिनी खंते, नव्या हेटे, ओम सुखळकर, पलक काटे, परी जगताप, प्रतिमा सोनकांबळे, रचित उईके, राजवीर सानप, रियांश मेश्राम, संस्कृती पाटील, संयुक्ता मडावी, शौर्य महाडोळे, शिवाज्ञा घोडे, शिवम वारे, श्रेयांश फुपारे, स्वरा निवल, उत्तरा राऊत, विहान मांडवगडे, विवांश गडपायले, युवांश शर्मा, द्वितीय क्रमांक अर्नवी राऊत, दिपांशु देमगुंडे, क्रिष्णम यवतीकर, परी जुमनाके, परिनिता दुबे, श्रेयश मिसाळ, श्रीनी गुप्ता, विराज केवटे, युवराज खुनकर, तृतीय क्रमांक आराध्या शिंगरूपकर, अर्हंत कांबळे, अथर्व देशपांडे, जान्हवी जाधव, तसेच प्रोत्साहनपर बक्षिस आनंदी बोडखे, चैतन्य भोजने, हार्दिका काळे, रूगवेद मदनकर सुहानी खवले, विनित येरेकर यांनी पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई,वडील, प्रशिक्षिका रोशनी काळे यांना देतात.