..आदिवासी माना समाजाचा नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा..
शोभायात्रेसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभूळगाव । प्रतिनिधी
आदिवासी माना समाज विद्यार्थी युवा संघटना नगर शाखा बाभूळगावच्या वतीने दि. 22 डिसेंबर रोजी बाभूळगाव येथे भव्य असा एकदिवसीय नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी विष्णुपंत डडमल हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सदानंद ढोक, विठ्ठलराव राऊत, हेमंेद्र राऊत, विष्णुपंत नारनवरे, सुभाष नारनवरे, सुधाकर गराटे, दिनेश दांडेकर, अनिल सावसाकडे, देविदास राणे व्यासपीठावर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माना जमातीच्या चालीरिती, संस्कृतीचे जतन तथा संवर्धन आणि लहान मुलांचे प्रोत्साहन वाढविणे, जमातीचे संघठन मजबुत व्हावे, समाजातील युवक-युवतींच्या पारंपारिक नृत्य कला तथा वेगवेगळ्या कलेला वाव देण्याकरीता या नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन व सामाजिक प्रबोधन करून विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गायत्री सावसाकडे यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. संचालन पुजा शेंडे यांनी तर उपस्थितांचे आभार कोमल सावसाकडे यांनी मानले. या महोत्सवात समाजातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक नगरशाखा अध्यक्ष योगेश बारेकर, विलास डडमल, उमेश सावसाकडे, कमलेश गराटे, गौरव जांभुरे, सचिन जांभुरे, अभिषेक गराटे, प्रतीक हजारे, सुरज हजारे, कुंदन वाघ, अंकुश खडसंग, होमराज नारनवरे, सागर सोनवणे, संजय दोडके, अनिल गायकवाड, अनुज जिवतोडे, विजय दांडेकर व समस्त माना समाज बंधू, भगिनींनी परिश्रम घेतले.