
आधार ‘केवायसी’ करा अन्यथा होऊ शकतो शासकीय लाभ बंद
तहसीलदार मीरा पागोरे यांचे नागरिकांना आवाहन
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रामाणिकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. बाभुळगाव तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या या दोन्ही योजना अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात तहसीलदार मीरा पागोरे यांनी बाभुळगाव तालुक्यातील या योजेनेच्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, लाभार्त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करावे, आधार केवायसी करावी. आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे पैसे डीबीटी द्वारा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आधार केवायसी व अपडेट करणे हे महत्त्वाचे आहे. आधार ‘केवायसी’ झालेली नसेल तर भविष्यात शासकीय योजनेचा लाभ बंद होवून पैसे खात्यात जमा होणार नाही याची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. शिवाय कार्डही अॅक्टिवेट राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर आताच रेशन दुकानावर जाऊन तुमचं केवायसी करून घ्या. ई-केवायसीमुळे रेशन कार्डधारकांची माहिती सरकारला मिळते. तसेच, रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो. रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
तसेच किसान आयडी कार्ड, बँक आधार लिंकिंग, आधार अपडेट यासाठी सुद्धा केवायसी करणे हाच पर्याय आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, आधार केवायसी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे तहसीलदार मीरा पागोरे यांनी केले आहे.