आसेगांव (देवी) येथे २२ तारखेला रोग निदान व उपचार शिबीर
सरपंच सचिन चव्हाण यांचा पुढाकार
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी (मेघे), जनसेवा ग्रामिण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ व ग्राम पंचायत आसेगांव (देवी) यांच्या संयुक्त विद्यमाने रोग निदान व उपचार शिबीर दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, आसेगांव (देवी) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते २ या कालावधी हे शिबीर राहील.
शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपना, वारंवार चक्कर येणे, नेत्ररोग- डोळ्याचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हर्निया, हायड्रोसील, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुत खड्याचे आजार पोटचे आजार, गलगंड (थॉईरॉईड), महिलांचे आजार, बालरोग-हृदयाला छिद्र असणे, मतीमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहाण मुलांचे सर्व आजार, अस्थिरोग जसे- संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फ्रॅक्चर तसेच हाडांचे आजार, त्वचारोग- खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार, यासह कान नाक घश्याचे आजार जसे- ऐकु न येणे, कानातुन पाणी वाहने, टॉन्सील, कान नाक घश्याचे सर्व आजार यांची मोफत तपासणी व निदान केले जाणार आहे. आवश्यक असल्यास रुग्णांना जागेवरच औषधोपचार देण्यात येईल. तरी या संधीचा आसेगांव (देवी) व परिसरातील रुग्ण, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सचिन चव्हाण तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामपंचायत कार्यालय आसेगांव (देवी) यांनी केले आहे.