गजानन इंगोले स्मृती स्मरणार्थ रक्तदान शिबिर
२१ दात्यांनी केले रक्तदान करून जपली स्मृती
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभूळगाव
प्रताप शिक्षण संस्थेचे माजी संचालक गजानन इंगोले यांच्या पुण्यस्मृती निमित्त रक्तदान शिबिराचे सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर हे ब्रम्हानंद राजेंद्र इंगोले यांनी त्याचे आजी-आजोबा गजानन इंगोले व इंदुबाई इंगोले यांची स्मृती स्मरणार्थ आयोजित केले होते. रक्तदान शिबिर घेऊन गरजूंना मदत करण्याच्या सोज्वळ उद्देशाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या माध्यमाने सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्यात आली. यावेळी २१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीन रक्तदान केले.
यात गजानन येरेकर,शेख असिफ शेख युसुफ,अभिषेक मोटके,प्रवीण नेवारे,अमोल इंगोले,संजय मंगळे, फैजान शेख,रवींद्र कोलते, पार्थ इंगोले,सागर जिचकार,शकील खान,डॉ,अनुप मासाल,विश्वास आगरकर,दुर्वास गायकवाड,अतिकेश इंगोले,मयुरेश खडसे,आशुतोष खडसे,मुन्ना ठाकूर,तुषार इंगोले,प्रतीक निवल,शेख इलियास,गितानंद बनकर, प्राजक्ता इंगोले,या रक्तदात्यांनी रक्तदान करून स्मरण केले. तसेच एकनील ब्लड बँकेकडून यथोचित सहकार्य लाभले.