गुंड प्रवृत्तीला लगाम घालावा…. न्हावी संघटनेची मागणी बाभूळगाव पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा बाभूळगाव बाभूळगांव येथील समस्त न्हावी व्यावसायीक संघटना, व नाभिक समाज, बाभूळगांवच्या वतीने पोलीस निरीक्षक लहूजी तावरे यांना दि. ४ रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये नाभिक व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपीवर कारवाईची मागणी करण्यात आली. अक्षय अशोक अमृतकर रा. घोंगडेबाबा ले-आऊट, बाभूळगांव यांचे शिवाजी पार्क, (शिवाजी चौक) येथे वेलकम हेअर पार्लर नावाचे सलुनचे दुकान आहे. सदर दुकानात दिनांक ०१/१२/२०२४ रोजी ६ वाजताचे सुमारास दुकानचालक हे एका ग्राहकाची कटींग करीत असतांना शहरातील गुंड प्रवृत्तीचा युवक सैय्यद कासिब सै. करिम, वय अं. २१ वर्ष, रा. इंदिरानगर, बाभूळगांव त्यांचे दुकानात आला व जबरदस्तीने माझी कटींग करून दे असे धमकावून म्हणाला. तेव्हा त्याला गिऱ्हाईक संपू दे, तुझी कटींग करून देतो असे म्हटले असता, त्याने काउंटरवरचा वस्तरा उचलला व अक्षयच्या गळयाला लावला, तेव्हा अक्षयने स्वतःचा बचाव केला असता, गैरअर्जदाराने तो ओढला त्यामुळे अक्षयच्या आंगठयाला दुखापत झाली होती. तेव्हा आरडाओरडा झाल्यामुळे आजुबाजूचे लोकं दुकानात जमा झाले. त्यामुळे सदर युवक तेथुन अश्लील भाषेत शिविगाळ करून निघुन गेला. याबाबत अक्षय अमृतकर यांने पोलिस स्टेशनला तक्रार केली, परंतू सदर युवकावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्याची हिंम्मत वाढुन रात्रीचे सुमारास अक्षय अमृतकर यांचे दुकानचे कुलूप तोडुन, दुकानाचे फलक फाडुन अस्ताव्यस्त फेकुन दिले. सदर युवक हा गुंड प्रवृत्तीचा असुन, खुनशी स्वभावाचा आहे. तो केव्हा काय करेल याचा नेम नाही. त्याच्यापासुन शहरातील न्हावी व्यवसायीकांना धोका निर्माण झाला आहे.. तेव्हा अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासुन आम्हाला संरक्षण देण्याकरीता त्यांचेवर वेळीच कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अशोक अमृतकर, किशोर अमृतकर, राजू कानेरकर, बंडू अमृतकर, श्याम अमृतकर, मनोज अमृतकर, प्रफुल खेडेकर, रुपेश अमृतकर, कुणाल वैद्य, राजू वाघ, वैभव माहुलकर, अक्षय माहुलकर, अक्षय अमृतकर, निलेश अमृतकर, गणपतराव कळसकर, चेतन अमृतकर इत्यादी व्यावसायिक व समाज बांधव उपस्थित होते.