गृहमंत्री अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा बाभूळगाव कॉंग्रेसने केला निषेध
तहसीलदारांना दिले निवेदन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव |
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेमध्ये केलेल्या अपमानात्मक वादग्रस्त विधानाचा बाभूळगाव तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने दि. २३ रोजी निषेध नोंदविण्यात आला. बाभूळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यात म्हटले होते,आता आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. जर तुम्ही देवाचे इतके नाव घेतले असते, तर तुम्ही स्वर्गात असता सात जन्मांसाठी. या विधानाचा बाभूळगाव तालुका कॉंग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा व त्यांना पदमुक्त करावे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, तालुकाध्यक्ष मोहन बनकर, श्रीकांत कापसे, अतुल राऊत, श्याम जगताप, शे.कादर शे. रहेमान, गजेंद्र कडूकार, अंकुश सोयाम, अक्षय राऊत, प्रदीप नांदुरकर, आशिष दिघाडे, अशोकराव खडसे, विलास मुनेश्वर,रात्न्पाल डोफे, राजेश काटेकर, सुरेश बेले, सुरेश कोडापे, नरेंद्र कोंबे, अशोकराव गावंडे, अजय गावंडे, जयंत घोंगे,राजेंद्र गुगलिया, मोहन भोयर, रितेश भरुत, माधव नेरकर, हबीब बेग, बबन बोमले, राहुल सहारे,प्रज्वल राऊत, सुबोध नागराळे, रमा बनसोड, साधना हजारे, रुख्मा गाजलेकर, संजय भैसे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.