Homeदिन विशेषघर तिथे शोषखड्डा उपक्रमाचा ग्रामपंचायत दिघी-१  येथे शुभारंभ

घर तिथे शोषखड्डा उपक्रमाचा ग्रामपंचायत दिघी-१  येथे शुभारंभ

घर तिथे शोषखड्डा उपक्रमाचा ग्रामपंचायत दिघी-१  येथे शुभारंभ

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयतीनिमित्त कार्यक्रम

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त आज २ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या संकलपनेतून ग्रामंचायत दिघी-१ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजणा महाराष्ट्र अंतर्गत “घर तिथे शोषखड्डा” या उपक्रंमाचा शुभारंभ करण्यात आला. त्या अंतर्गत सरपंच संगीता काथोटे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रकाश नाटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा जि.प.यवतमाळ यांनी शोषखड्डे बाबत माहिती देताना सांगितले कि, शोषखड्ड्यांमुळे गावात पाणीपातळीत वाढ होनार असून सांडपाणी उघड्यावर येणार नाही व त्यामुळें डासमुक्त होऊन रोगराई निर्मूलन होईल व मलेरिया, ताप, चिकणगुनिया यासारखे आजार होणार नाही. लाभार्थ्यांना प्रती शोषखड्डा 3295 रूपये मिळणार असल्याने पात्र लाभार्थी यांनी लाभ घेणेबाबत गावकऱ्यांना आवाहन केले. यावेळी उपसरपंच निलेश पाचपुते ,  ग्रा. सदस्य प्रिया भाकरे, पंचायत समितीचे सहायक प्रकल्प अधिकारी संदिप केळतकर,  अभियंता शिशिर मुंडे,  एकनाथ होले,  प्रदीप थोरात, पवन ढाकुलकर, रोजगार सेवक व गावकरी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत गोंधळी अंतर्गत किन्ही येथे जि. प. शाळेला वाल कंपाऊंड व शौचालयाचे सरपंच फिरोज पठाण यांच्या हस्ते व उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी व गावकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img