
मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालयाने जोपासली उत्कृष्ठ निकालाची परंपरा
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
बाभूळगाव येथील मातोश्री नानीबाई घारफळकर उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ठ निकालाची परंपरा जोपसली आहे. आपली परंपरा कायम राखत यावर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 76.86 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी द्रौपद संजय कुरवाडे ह्याने 91.17 टक्के गुण घेवून तालुक्यातून पहिला येण्याचा मान मिळविला. या विद्यालयाचे कला, विज्ञान शाखेचे विद्यार्थी तालुक्यातून प्रथम आले.
विज्ञान शाखेतूनच अर्चना सुरेश पडघान 80.50 टक्के घेवून व्दितीय तर वैभवी संतोष भुसारी 74.17 टक्के घेवून तृतीय आली आहे. याशिवाय कला शाखेतून प्रथम सायली अविनाश भोयर 79.17 टक्के, पवन गजानन शेंडे 63.17 टक्के व्दितीय तर पुनम गजानन फाले 60 टक्के गुण घेवून तृतीय आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळचे सचिव कृष्णा कडू, संचालिका माधवी कडू यांनी कौतुक केले. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येथील मुख्याध्यापक प्रा. दिनेश रामटेके, प्रा. सारिका भगत, प्रा. एस. डब्ल्यु. शेंडे, प्रा. प्रियंका निघोट, प्रा. प्रविण गाडेकर, ऋषिकेश कडू, प्रा. निलीमा पाटील, प्रा. शुभम कडू, प्रा. कल्केश गारघाटे, शिक्षकेतर कर्मचारी सुरज कांबळे, कुणाल महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.