Homeमहाराष्ट्रट्रॅव्हल्सची दुचाकीला पाठीमागुन धडक;एकाचा मृत्यू

ट्रॅव्हल्सची दुचाकीला पाठीमागुन धडक;एकाचा मृत्यू

ट्रॅव्हल्सची दुचाकीला पाठीमागुन धडक;एकाचा मृत्यू

सेलू – मानवत महामार्गावरील लिंबोटीच्या ओढ्याजवळील घटना

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :-  (परभणी/ताडबोरगाव)

भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाना उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवार १६ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सेलू – मानवत रोडवर लिंबोटीच्या ओढ्या जवळ घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अर्जून मारोती निर्वळ वय २८ वर्ष रा. सोमठाणा ता. मानवत, असे मयताचे नाव आहे. या बाबत कृष्णा निर्वळ यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे भाऊ त्यांची दुचाकी एम.एच. १० ए.के. ४४४७ या गाडीने येत असताना एम.एच. २३ डब्ल्यू १८७७ या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स चालकाने भरधाव वेगात पाठीमागुन धडक दिली. अपघातात अर्जून निर्वळ गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी मानवत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. नागनाथ पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img