बाभुळगाव तालुक्यातील दाभा-पहुर येथे आढळला दुर्मिळ पांढऱ्या पट्टयाचा दुर्मिळ गिधाड.
दिव्य दृष्टी वृत्तसेवा:
गिधाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणाऱ्या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असतो. भारतात गिधाडाच्या ९ प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पट्याचा गिधाड हा अत्यंत दुर्मिळ आहे. महाराष्ट्र मध्ये या गिधाडाची संख्या अवघी दहा आहे. त्यापैकी एक गीधाड हा बाभुळगाव तालुक्यातील दाभा-पहुर भागात आढळून आला.ओळख पटावी म्हणून या गिधाडच्या पायाला विशिष्ट प्रकारचा क्रमांक लावला आहे.शिवाय कॉलर आयडी जी पी एस सुद्धा लावले आहे. या दुर्मिळ गिधाडला वन्यजीव प्रेमी श्याम जोशी वन कर्मचारी अमित शिंदे यांनी जिवनरक्षण केले असून त्याची पुढील तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. हा गिधाड कुठून कसा आला याचा देखील अभ्यास वनविभागा कडून केला जातो.