दारव्हा येथे विवाहितेची गळा दाबुन हत्या, सासरच्या पाच जणांना अटक
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :
दारव्हा शहरातील गवळीपुरा येथील विवाहितेची सासरच्या मडळीने गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी विवाहितेचे वडील लल्लु बांद चौधरी रा. खामगाव जि. बुलढाणा यांनी पोलीस स्टेशनला लेखी तकार दिली. सर्व आरोपींना दारव्हा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११वाजताच्या सुमारास विवाहित महिला शबिना शहारूख चौधरी वय २७ वर्ष रा. गवळीपुरा, दारव्हा हिला सासरकडील मंडळीनी मृतावस्थेत उपजिल्हा रूग्णालय दारव्हा येथे दाखल केले. तिने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहीती दिल्याने सुरवातीस दारव्हा पोलीसांनी अकस्मात मृत्यु नोंद करून तपास सुरू केला. एकंदरित परिस्थीतीजन्य पुराव्या वरून पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी बारकाईने तपास सुरू केला. मृतकाचे शवविच्छेदन केल्यावर वैदयकिय अधिकारी यांनी गळा दाबल्याने श्वास गुदमरून मृत्यु झाला असा अभिप्राय दिला. मृतक शबाना हिचे वडील लल्लु बांद चौधरी रा. खामगाव जि. बुलढाणा यांनी पोलीस स्टेशनला लेखी तकार दिली. त्यामध्ये मृतक हिचा पती शहारूख सलीम चौधरी हचिक, दिर इस्माईल चौधरी, फारूख चौधरी, सासरा सलीम चौधरी, सासु तारा चौधरी हे त्यांच्या मुलीला त्रास देवुन मारहान करीत होते. माहेराहून पैसे मागणे व चारित्र्यावर संशय घेवून तीचा प्रचंड छळ करीत होते. आरोपीनी संगनमत करून तिचा गळा दाबुन खुन केला आहे असे तक्रारीत नमूद केले. तकारी वरून दारव्हा पोलीसांनी कलम १०३(१), ३(२) भारतीय न्याय सहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटना संशयास्पद वाटत असल्याने दारव्हा पोलीसांनी पाचही आरोपिंना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, महेद्र भुते, सुरेश राठोड हे करीत.