Homeधर्म / समाजदिवंगत शिक्षक विशाल खांदवे यांचा जयंती समारोह

दिवंगत शिक्षक विशाल खांदवे यांचा जयंती समारोह

दिवंगत शिक्षक विशाल खांदवे यांचा जयंती समारोह

शाळकरी विद्यार्थ्यांना केले ब्लँकेट वाटप.

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :

बाभूळगाव येथील मातोश्री नानीबाई घारफळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार दिनांक १२ डिसेंबर रोजी दिवंगत शिक्षक विशाल नानाजी खांदवे यांचा जयंती समारोह घेण्यात आला.विद्यालयातील सर्वांचे लाडके शिक्षक म्हणून ओळख असलेल्या विशाल खांदवे यांचा जन्मदिनानिमित्त आर्थिक दुर्बल परिवारातील ४० विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

दिवंगत खांदवे सरांचे माजी विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्याकडून उपस्थितांना भोजनदानाचा कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ माधवी कडू ह्या होत्या. या कार्यक्रमास नानाजी खांदवे, उद्धवराव खांदवे, पत्रकार प्रवीण लांजेकर, पत्रकार शेहजाद शेख, नगरसेवक अनिकेत पोहेकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संचालिका माधवी कडू यांनी विशाल खांदवे सर यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. तसेच मुख्याध्यापक दिनेश रामटेके यांनी खांदवे सरांनी केलेल्या जीवन कार्यातील उत्कृष्ट कार्याचा सुद्धा याप्रसंगी उल्लेख केला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सारिका भगत यांनी तर आभार प्रदर्शन धूर्वे सर यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,शाळेतील विद्यार्थीवर्ग,तथा खांदवे सरांचे माजी विद्यार्थी व मित्रमंडळातिल खुशाल पडोळे, वैभव गाडेकर,गीतानंद बनकर, सर्वेश मडावी, सुजन जगताप,साई राऊत,अनिकेत घ्यारे,सागर जांभुळकर,शुभम गावंडे,रोशन ढोकणे,राहुल आत्राम,भूषण होटे, प्रीतम संकेपाल व खांदवे सरांचे थोरले बंधू नितीनजी खांदवे यांचेसह शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img