नानीबाई घारफळकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभुळगाव येथे संविधान दिन व २६ नोव्हेंबर हा शहिद दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुशील बत्तलवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यकम अधिकारी प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याधापक दिनेश रामटेके होते. रामटेके यांनी संविधानाच्या विवीध पैलुवर प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले.
भारताच्या संविधानाला ७५ वर्ष पुर्ण झाले.तेव्हापासूनच संविधान देशात अमलात येत असुन त्यावर भारताचे सुंपुर्ण कार्यभार सुरु आहे. जगातील उत्कृष्ठ असे भारतीय संविधान आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुशील बत्तलवार यांनी सांगितले. तसेच संविधानाचे वाचन करण्यात आले. संविधानाची शपथ घेण्यात आली.तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या हल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रुपेश आडे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.भावना पिल्लई, प्रा. मिनल वानखडे, प्रा. कांचन कठाडे, प्रा. प्रियंका नैताम, प्रा.आरती आष्टेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी संजय ठवळे, आकाश वातकर, संदिप कुडे, सागर गोळे, मनिष कडु, गजानन गावंडे, आशिष वानरे, चंदु लांडगे, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.