
नायगाव येथे शिवसेना शाखेची स्थापना
सचिन महल्ले यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
तालुक्यातील नायगाव येथे दि. १३ जानेवारी रोजी शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. राज्याचे मृद व जल संधारण मंत्री ना. संजय राठोड यांचे मार्गदर्शक सुचनेनूसार, जिल्हा संपर्क प्रमुख हरीहर लिगणवार यांचे मार्गदर्शनात उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले यांचे नेतृत्त्वाखाली बाभूळगाव तालुक्यात पक्ष वाढीच्या दृष्टीने शाखा तयार करणे, शिवसैनिकांची नोंदणी करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायगाव येथे शिवसेना शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमासाठी उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, तालुका संघटक विजय भेंडे, शहर प्रमुख प्रविण लांजेकर, उपतालुका प्रमुख स्वप्नील मुडे, महिला आघाडीच्या अपर्णा लाकडे(वानोडे), ज्योती चचाने, सोनाली गायकवाड, हलीमा शेख, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे, सह संघटक हेमराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सचिन महल्ले यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांना सचिन महल्ले यांच्या हस्ते शिव बंधन बांधण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून पक्ष प्रवेश करीत आहोत, असे मत नव प्रवेशित शिसैनिकांनी व्यक्त केले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून तालुक्यातील शिवसैनिक शिवसेनेसोबत सक्रीय राहून संघटितपणे कार्य करणार असल्याचा विश्वास सचिन महल्ले यांनी व्यक्त केला. नायगाव येथे तालुक्याच्या शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच शाखा स्थापन झाली असून युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे मत रवींद्र काळे यांनी व्यक्त केले. यावेळी शाखा प्रमुख म्हणून अमोल पवार, उपशाखा प्रमुख प्रवीण राऊत, सचिव सागर खोब्रागडे, संघटक मनोज कोयरे, साहेबराव शिंदे, अमोल सक्रापुरे, मयूर खोब्रागडे, अंकुश कांबळे, मनोज चचाने, योगेश चचाने , नंदू चौधरी, अमोल गोडे, अनिल राठी यांचेसह असंख्य शिवसैनिकांची निवड करण्यात आली. यावेळी अक्षय उईके, अनिश साव, प्रेम कांबळे, दर्शन चचाने, सुमित खोब्रागडे, मंथन चामलाटे, दीपक सुरस्कर, अमित कांबळे, अजय नेवारे, आदेश भोयर, सुरज बगडते, विलास नागोसे, संतोष अहिरे, अभय भोयर, रेहान शेख, शाहबाज शेख, गौरव नागोसे, हिरा शिंदे, उमाजी पवार, हिम्मत पवार, कैलास पवार, सुरेश पवार, प्रकाश पवार, गाजू शिंदे, चेतन नेहारे, ज्ञानेश्वर राऊत, अजय रामुदे, अनिकेत नेवारे, ज्योतिबा अहिरे, सलमान पठाण, अंकुश अहिरे, मंगेश कोवे, विनोद चामलाटे आदि शिवसैनिक उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विक्रम बऱ्हाणपूरे यांनी दिली.