Homeयवतमाळपगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने सापांबद्दल जनजागृती

पगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने सापांबद्दल जनजागृती

पगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने सापांबद्दल जनजागृती

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ :

यवतमाळ येथे समता सैनिक दल यवतमाळ शाखेच्या पाच दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत दि. ४ डिसेंबर रोजी पगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने नागभुमी विहारामध्ये वन्यजीव आणि सापांबद्दल जनजागृती मोहिमे अंतर्गत सापांची ओळख करून त्याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये उपस्थितींना प्रमुख मार्गदर्शन सर्पमित्र दिनेश तिवाडे, जयकुमार वानखेडे यांनी केले. या  कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून संतोष कांबळे उपस्थित होते.

सर्पमित्रांनी  सांगितले कि,  आपल्याकडे नाग, मण्यार, फुरसे, घोणस हे मोजून चारच विषारी साप जास्त प्रमाणात आढळतात. हे साप ओल्या ऐवजी कोरड्या जागेत राहणे पसंत करतात. त्यामुळे पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा घरातील प्रकाशाकडे आकर्षित‌ होऊन घरात पाल आणि उंदराला आपले भक्ष बनविण्यासाठी हे साप घरात सुध्दा येतात.  त्यामुळे पावसाळ्याच्या काळात सावध राहणं गरजेचे आहे. याच काळात सर्पदंशाच्या आणि सापांना मारण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कानावर येतात. म्हणून नागरिकांनी शक्य तेवढी स्वच्छता पाळावी. घराची, घरातल्या प्रत्येक वस्तूची वेळच्या वेळी साफसफाई करावी. घराच्या किंवा कुंपणाच्या भिंतींना पडलेली छिद्र बुजवावी. घरात अडगळीची खोली असेल, तर ती स्वच्छ करावी, तिथल्या अनावश्यक वस्तू फेकून द्याव्या. कारण साप हे घराच्या आडोशाला आढळतात. बूट हेही सापांची आवडती जागा असते. घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड-विटांचे ढिग, लाकडांचा साठा करून ठेवू नये. घराच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. घरात रोपं असतील, तर तीसुद्धा स्वच्छ करावी. बाहेरील झाडांच्या फांद्या खिडक्या-दरवाजांना लागून घरात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर परंतु जमिनीपासून उंचीवर ठेवा. गवतातून चालताना पायात बूट असूद्या. अंधारातून जाताना बॅटरी सोबत बाळगा. तसंच रात्री शक्यतो जमिनीवर झोपू नये साप चावला तर फार तर ती जखम स्वच्छ धुवावी आणि त्वरित जिल्हा किंवा सरकारी रुग्णालयात जावे. आणि डॉक्टरांना दाखवावे. याबाबत शेतकरी आणि नागरिकांनी सापापासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्यावी यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. साप हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे तो जिवंत राहणे आवश्यक आहे.

सापाला घाबरू नका  सतर्क राहा, आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील पगमार्क वाइल्ड लाईफ फाऊंडेशनच्या सर्पमित्रांशी संपर्क साधा आणि त्यांना घटनास्थळी बोलावून  साप आणि वन्यजीवांचे प्राण वाचवा. असा संदेश यावेळी देण्यात आला.  सूत्र संचलन सुरज पाटील यांनी केले. यावेळी पगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे वन्यजीव रक्षक रोशन मेश्राम, करण इंगोले, पवन गवई, सुगत भगत,सुशांत सूर्यवंशी, यश कांबळे, अनिकेत मेश्राम इत्यादीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img