
पहुर येथे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत कबड्डी सामने
— बाभूळगाव पोलीस स्टेशनचा पुढाकार—-
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतुन पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता सबंध सलोख्याचे करण्याकरिता गावांपासुन ते जिल्हा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस निरिक्षक लहुजी तावरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. बाभुळगाव हद्दीतील ग्राम पहुर येथे दिनांक १० जानेवारी रोजी कब्बडी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यामध्ये एकुण १५ संघानी सहभाग नोदंविला होता सर्व सामने उत्साहात व शांततेत पार पडले.
या कब्बडी टुर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक पहुरच्या संघाने पटकविला असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना पोलीस निरिक्षक एल डी तावरे यांचे वतिने ट्रॉफी देण्यात आली. त्याच प्रमाणे पुढील स्पर्धेकरिता पहुरच्या संघाची निवड करण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये पहुर येथिल कब्बडी पंचकमेटी प्रमोद गेडाम, सागर वलके, मनोज खडसे, अजय जिरापुरे, निखिल कुमरे, विक्रम गांवडे यांनी महत्वाची भुमिका पार पाडली शिवाय पो.स्टे. बाभुळगाव येथिल सर्व अधिकारी अंमलदार यांनी परिश्रम घेतले. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत विभागात होणा-या पुढील स्पर्धेकरिता ग्राम पहुर या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.