वणी तहसीलचा लाचखोर पुरवठा निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात…!
गरिबांच्या धान्याचा काळाबाजार भोवला
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। यवतमाळ:
वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयातील लाचखोरी सर्वश्रुत आहे. येथील पुरवठा निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने आज २४ ऑक्टोबर, गुरूवारी दुपारी ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेल्या काही महिन्यापासून या लाचखोर अधिकाऱ्याच्या कारनाम्याची चर्चा वर्तुळात सुरू होती. संतोष उईके (वय ४०) असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी वणी येथील तक्रारदाराला ७० हजार रुपये लाचेची मागणी केली.
या संतोष च्या संपर्कात तालुक्यातील रेशनचा काळाबाजार करणारे अनेक जण संपर्कात होते. अखेर परवानाधारकाने एसीबीकडे तक्रार केली आणि लाचखोर अधिकारी गजाआड झाला. यापैकी काहीं रुपयांची लाच पहिलेच स्वीकारली होती. उर्वरित काहीं हजारांची रक्कम त्यांनी अमरावती एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्यासमोरच स्वीकारली.वणी तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागात पैसे देताना संतोष उइके याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लाचेस्वरूपात स्वीकारलेली ७० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वृत लिहीपर्यंत वणी पोलिस ठाण्यात एसीबीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई अमरावती येथील एसीबी पोलिस निरीक्षक योगेश दंदे व सहकारी यांनी केली.