Homeक्राईमफाळेगावं येथे १.६० लाखाच्या सोयाबीनची चोरी.

फाळेगावं येथे १.६० लाखाच्या सोयाबीनची चोरी.

फाळेगावं येथे १.६० लाखाच्या सोयाबीनची चोरी.

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव.

बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव शिवारात असलेल्या ५४ वर्षीय श्रीकृष्ण ठाकरे यांच्या शेतातील बंड्यात भरून असलेले ४० क्विंटल सोयाबीन अंदाजे एक लक्ष साठ हजार रुपये किमतीचे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताचे दरम्यान उघडकीस आली.

    तालुक्यातील फाळेगाव येथील रहिवासी असलेले श्रीकृष्ण रामचंद्र ठाकरे यांचे गावाला लागूनच १५ एकर शेत आहे.त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने ते अधिकाधिक वेळ शेतातच घालवतात. त्याकरिता त्यांचे शेतातील साहित्य,शेतमाल,तसेच विश्रांती साठी शेतात तीन खोल्यांचा बंडा उभारला आहे.या वर्षी शेतात कापूस,तूर व सोयाबीनची पेरणी केली होती.त्यापैकी सोयाबीनचे ४० क्विंटल उत्पन्न झाले.बाजारपेठेत सध्या भाव कमी असल्यामुळे ते बंड्यावर ५२ कट्ट्यांमध्ये भरून ठेवले होते.दिनांक ४ डिसेंबर रोजी ते व त्यांचा सालदार विठ्ठल चाहाकार हे सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेतातून घरी गेले.तोवर शेतमाल सुरक्षित भरून होता.त्यानंतर लग्नकार्य निमित्ताने श्रीकृष्ण ठाकरे हे बाहेरगावी मुक्कामी गेले.याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी ५२ कट्ट्यातील ४० क्विंटल सोयाबीन चोरून नेल्याने शेतमालकास १ लक्ष साठ हजार रुपयांचा फटका बसला आहे.दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी सालदार विठ्ठल शेतात पोहोचतच त्यास बंड्याच्या फटकाचा कुलूप कोंढा तोडून दिसला.आत पाहिले असता संपूर्ण सोयाबीनचे कट्टे गायब असल्याचे निदर्शनास आले.याची सूचना लगेचच शेतमालक श्रीकृष्ण ठाकरे यांना देण्यात आली.विशेष बाब म्हणजे याच काळात रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत संपूर्ण फाळेगाव येथील विद्युत पुरवठाही खंडित झालेला होता.त्यानुसार ठाकरे यांनी बाभुळगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून सदर प्रकारनाचा तपास बाभुळगाव पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img