Homeमहाराष्ट्रफाळेगाव फाट्यासमोर भरधाव कारने दुचाकी स्वारास चिरडले

फाळेगाव फाट्यासमोर भरधाव कारने दुचाकी स्वारास चिरडले

फाळेगाव फाट्यासमोर भरधाव कारने दुचाकी स्वारास चिरडले

दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यु

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव:

तालुक्यातील फाळेगाव फाट्यासमोर एका भरधाव येणा-या कारने समोरून येणा-या दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना दि. 18 रोजी रात्री 8 वाजताचे सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यु झाला. अपघात इतका भयंकर होता कि यात दुचाकीचा चुराडा झाला, तर कारचे मोठे नुकसान झाले आहे.

      यातील मृतकाचे नाव बादल सुरेश शिंदे, वय 24 वर्षे, रा. नायगाव असून तो आपले दुचाकी क्र. एम.एच.29 बी.ए. 0475 ने देवगाव कडून नायगावकडे येत होता. दरम्यान बाभूळगावकडून धामणगावकडे जाणारी टोयोटा इटिओस  क्र. एम.29 ए.डी. 3811 या भरधाव येणा-या कारने फाळेगाव फाट्यासमोर माऊली धाब्याजवळ सदर दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार बादल शिंदे वाहनासह अक्षरशः फुटबॉल सारखा फेकल्या गेला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. तेथे उपस्थित नागरिकांनी बादल शिंदे याला बाभूळगाव ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचारासाठी आणले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर केले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यु झाला.

बादल शिंदे हा गॅस रिपेरिंगचा व्यवसाय करून आपल्या कुटंूबाचा उदरनिर्वाह करीत होता. या घटनेने नायगावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती फाळेगावचे पोलीस पाटील गजानन नेहारे यांनी पोलीसांना दिली. बाभूळगाव पोलीसांनी घटनास्थळी जावून दोनही वाहने पोलीस स्टेशनला जमा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img