
बलशाली गणेश मंडळाने कायम राखली सार्वजनिक उपक्रमाची परंपरा
गुलालमुक्त व डीजे मुक्त मिरवणूक मंडळाचे विशेष आकर्षण
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
बाभूळगाव शहरालगत असलेल्या फसाटे ले आऊट, गणोरी येथील बलशाली गणेश उत्सव मंडळाने दरवर्षी सार्वजनिक उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी सुद्धा आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, फलकांद्वारे सार्वजनिक संदेश, यासह चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मंडळाची स्थापना सन २००४ मध्ये करण्यात आली असून तेव्हापासून सदर मदल सार्वजनिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मंडळामध्ये राज्य शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले जाते. गुलालमुक्त व डीजे मुक्त मिरवणूक मंडळाचे विशेष आकर्षण असते.
यावर्षी मंडळाने श्री गणेश आगमनानंतर लगेचच ३१ ऑगस्ट रोजी ग्रामीण रूग्णालय बाभूळगावच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेतले. या शिबीरात ५२ रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत. त्यानंतर वृक्षारोपण करून, गणेश मंडळाचा परिसर व ले आऊटमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर 3 सप्टेंबरला बालगोपालांसाठी रंगभरण स्पर्धा, चमचा लिंबु, मटका फोडणे, संगित खुर्ची, बाॅटलमध्ये पाणी भरणे आदि स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये इशिता रोकडे, पलक मेश्राम, आर्या गांडोळे, दिवांशी पासवान, आराध्या चोरे, आरुषी कोळंकर, श्रेया पासवान, आरुषी लोमटे, अर्नावी रोकडे, शिवांगी पासवान, अनया ठाकरे, नित्या पासवान, अर्वी लोमटे, दिविजा बऱ्हाणपूरे, दैविक घाटोळ, अव्यान पोफरे, इशिता बहाड, निधी लामसोंगे, प्रिन्सि पासवान यांनी सहभाग नोंदविला.या सोबतच मंडळामध्ये राज्य शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणे सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच दरवर्षी श्रींची विसर्जन मिरवणूक ही डीजे मुक्त व गुलाल मुक्त काढण्यात येते. या मंडळात विविध कार्यक्रमांकध्ये परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहतो. रात्री मंडळाचे कार्यकर्ते मंडपात थांबून सुरक्षेची काळजी घेत आहेत. यावेळी स्थानिक पोलिसांचे मोलाचे सहकार्य मिळते.

सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बलशाली मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी मंडळाचे अध्यक्ष सुधीर रोकडे, उपाध्यक्ष सुधाकर ठाकरे, सचिव विक्रम बऱ्हाणपूरे, कोषाध्यक्ष, अमोल घाटोळ सदस्य निलय पोफारे, दिनेश कामडी, दिनेश रोकडे, अमोल मेश्राम, प्रकाश ठवकर, दिनेश रोकडे, विजय ढोबळे, अनुप दंडारे, शुभम आसकर, आयुष सागळे, हरीश कामडी, तिलक डोमडे, सुदर्शन रोकडे, वैभव जयपूरकर, मंथन गौरकार, दिनेश मांगुळकर, शाश्वत ठवकर, हिमांशू ढोबळे, अभीषेक रोकडे, प्रणय पिसे, रुद्रेश रोकडे, स्वर्नेश रोकडे परिश्रम घेत आहेत.




