Homeधर्म / समाजबाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात नेत्रदान.

बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात नेत्रदान.

बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात नेत्रदान.

समाजहित जोपासत दिली इतरांना जग बघण्याची संधी.

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव

सर्व स्वप्ने डोळ्यात होती. पण नियतीने क्रूर डाव खेळला.आज दिनांक १५/११/२४ दुपारी ३ वाजता दुचाकीच्या भीषण अपघातात जखमी तेजस पुंजाराम सोयाम वय वर्ष २० आणि कु शिवाणी संजय सुरपाम १९ वर्ष यांना ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे  आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना मुसळे , अधिपचारिका दीपाली गावंडे यांनी मृतकांचे नातेवाईक यांचे समुपदेशन केले. त्यावेळी त्यांनीं नेत्रदान करण्याचा निर्णय घेत जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या बहुमोल निर्णयामुळे चार अंध व्यक्तींना जग बघण्याची संधी मिळणार आहे.

      यावेळी डॉ सुखदेव राठोड ( नेत्ररोग तज्ञ) जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, डॉ. रमा बजोरिया वैद्यकीय अधिक्षक  बाभूळगाव,यांचे  मार्गदर्शन लाभले.तसेच यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ लीना मुसळे(मानकर),अधिकचारीका श्रीमती दीपाली गावंडे,कक्ष सेविका प्रणाली बीजावडे आणि सुरक्षा रक्षक नितीन दिवटे उपस्थित होते.विशेषता डॉ रमा बजोरिया यांनी प्रसंगावधान साधून वसंतराव नाईक रुग्णालय  यवतमाळ येथील नेत्रशल्यचिकित्सक डॉ सुधीर पेंडके नेत्ररोग विभाग प्रमुख ,डॉ स्नेहल बोंडे सहाय्यक प्राध्यापक,डॉ अक्षय पडगीलवर व्याख्याता,डॉ सादिक बेनिवाले निवासी  डॉ -२,डॉ सचिन मीना निवासी डॉ -१,डॉ जयप्रकाश ढाका आदीसोबत संपर्क साधून नेत्रदानाची प्रक्रिया उत्तमरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img