विधानसभा निवडणुक २०२४ संबंधाने बाभुळगाव शहरात स्पेशल फोर्सचा रूटमार्च प्रतिनिधी । बाभुळगाव आगामी होवु घातलेल्या विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ संबंधाने निवडणुक शांततामय वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने आज दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजतचे दरम्यान पोलीस स्टेशन बाभुळगांव कार्यक्षेत्रातील बाभुळगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन बाभुळगाव येथील ०३ अधिकारी तसेच आंध्र प्रदेश स्पेशल पोलीस फोर्स चे कंपनी मधील ०२ अधिकारी व ६० पोलीस अंमलदार यांचे उपस्थितीत रूटमार्च घेण्यात आला.
सदरचा रूटमार्च हा विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ संबंधाने यवतमाळचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब,अपर पोलीस अधिक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाभुळगाव येथील पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, यांचे वतीने घेण्यात आला आहे.