
बाभूळगाव शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांना अभिवादन
-: बाभूळगाव | प्रतिनिधी :-
शिवसेना बाभूळगाव शहरच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवछत्रपती चौकातील शिवाजी पार्क येथे दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी शहर प्रमुख प्रवीण लांजेकर, माजी उप नगराध्यक्ष रवी काळे, नगर सेवक अमर सिरसाठ, अभय तातेड, उप शहर प्रमुख चंद्रकांत बोरकर, नरेश सातपुते, प्रसिद्धी प्रमुख विक्रम बऱ्हाणपूरे, अंकित खंते, हेमराज शिंदे, जितेंद्र शिंदे, जयवंत ढोबळे, नंदू लांडे, सचिन मालखेडे, निकेश शिंदे, योगेश दानव, पिंटू काळे, निलेश खोडे,नितिन टोणे, हेमलता काळे,नागो शिंदे,रामदास वाघाडे आदि उपस्थित होते.