Homeदिन विशेष''बेंबळा प्रकल्पग्रस्तांनी रोखला यवतमाळ-धामणगाव राज्यमार्ग''

”बेंबळा प्रकल्पग्रस्तांनी रोखला यवतमाळ-धामणगाव राज्यमार्ग”

बेंबळा प्रकल्पग्रस्तांनी रोखला यवतमाळ-धामणगाव राज्यमार्ग

विविध मागण्यांसाठी चोंढी फाट्यावर केले चक्काजाम आंदोलन

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-

बेंबळा धरणग्रस्त न्यायहक्क समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी दि. 10 ला , सकाळी 11 वाजता चोंढी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यवतमाळ-धामणगाव राज्यमार्ग एक तास रोखल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मीरा पागोरे यांनी आंदोलनस्थळी जावून निवेदन स्वीकारले.

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना शासकीय नोकरी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विना अट देण्यांत यावी. ज्यांनी नौकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करुन एकमुस्त 40 लाख रुपये देण्यांत यावे. बेंबळा प्रकल्पामधील बाधीत गावे उदा. कोपरा क्र. 2, कोल्ही क्र. 1 व 2 मिटणापुर व पहूर क्र.1 या गावांना त्वरीत महसुल दर्जा प्राप्त करुन देण्यांत यावा. बेंबळा प्रकल्प बाधीत कुटूंबातील प्रत्येक सदस्याला “प्रकल्पग्रस्त सन्मान निधी ही योजना राबविण्यांत यावी. सन 2007 चे केंद्र सरकारने लागु केलेले धोरण बेंबळा प्रकल्पाला लागु करण्यांत यावे.  बेंबळा प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्या भोई कुटूंबाला मासेमारी करण्याचा हक्क देण्यांत यावा.  प्रकल्पातील बाधीत कुटूंबापैकी ज्यांच्याकडे शेती नव्हती परंतू त्यांची घरे गेली अश्यांना सुधारीत कायद्यानुसार वाढीव अनुदान देण्यांत यावे. प्रकल्पासाठी हस्तगत केलेल्या शेतीला कवडीमोल भाव दिल्याने 10 लाख रुपये प्रति हेक्टरी वाढीव मोबदला देण्यांत यावा. पुनर्वसीत गावठाणामध्ये अपूर्ण असलेल्या नागरी सुविधांची त्वरीत पुर्तता करण्यांत यावी.  जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे महिण्यातून एकदा बेंबळा प्रकल्प आढावा बैठक लावण्यात यावी. आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मोहन भोयर, माधव नेरकर, राजानंद बनसोड, पंकज रुणवाल, विजय बुटके, संजय मुन्दलकर, अंकुश लांडे, अक्षय डगवार, निलेश धाये, राजकुमार पत्रे यांचेसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img