Homeदिन विशेषबैलपोळा !! सण महाराष्ट्राचा..... कष्टकरी शेतकऱ्याच्या सहकारी मित्राचा!!

बैलपोळा !! सण महाराष्ट्राचा….. कष्टकरी शेतकऱ्याच्या सहकारी मित्राचा!!

बैलपोळा !!

सण महाराष्ट्राचा….. कष्टकरी शेतकऱ्याच्या सहकारी मित्राचा!!

कु. आकांक्षा वर्मा | बाभूळगाव :-

सण हा हिंदू परंपरेचा, प्रत्येक प्राणी जीवे संरक्षणाच्या संकल्पाचा!!

किती छान ही संस्कृती, किती छान ही परंपरा ज्या मध्ये प्रत्येक जीवाच्या उपकाराचे ऋण फेडण्यासाठी एकतरी विशेष दिवस आपण साजरा करतो.

तंत्रज्ञानाने नांगरणीचे आज अनेक उपाय जरी काढलेत परंतु पर्यावरण पोषक ते नाहीत. इंधन संपले की यंत्रणा बंद होऊन जातीलही परंतु ऐतिहासिक परंपरेनुसार चालत आलेली नांगरणी पद्धत म्हणजेच जी बैलजोडी द्वारे केली जाते ती पर्यावरण पोषक तसेच साधारण शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीची शेती करून पोषक असे पीक घेऊन सुखी होतो, आणि यंत्रणे मुळे जग कितीही वेगात काम करेल मात्र शेतकऱ्यांसोबत त्याचे भाव जुळणे कठिणचं!!

असो पण आनंद वाटतो की आजही काही गावाकडल्या भागांमध्ये पारंपारीक पद्धतीची शेती केल्या जाते. ज्यांच्या मुळे पर्यावरणात काही प्रमाणात पोषकता उरलेली आहे.

नक्कीच बैल आणि सेंद्रिय शेती यांचे शाश्वत संबंध आहे असे आपण म्हणू शकतो.

लोखंडी नांगराला जुंपून पेरणी करणे असो नांगरणे असो वा ओझेवाहक म्हणून बैलांचा वापर करणे असो मात्र हा कष्टकरी राजा कधी थकला नाही. कडक ऊन असो वा मुसळधार पाऊस असो तो कधी मुकला नाही.

नाही. कडक ऊन असो वा मुसळधार पाऊस असो तो कधी मुकला नाही.

वर्षभर अथोनात ओझ्यांचे वहन करून त्यांचे खांदे रक्ताळतात म्हणून मालक पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांदे मळतात ज्या मुळे हळदी चे औषधी गुणधर्म बैलांच्या खांद्याचा जखमा बऱ्या करतात व तूप स्निग्ध पदार्थ असल्यामुळे बैलांचा शारीरिक आरोग्य सुदृढ राहते व दुसऱ्यादिवशी त्यांचे पारंपरिक पूजन करून आपण सर्व कृतज्ञता व्यक्त करतो….

मात्र बैलांची एक दुःखद व्यथा व्यक्त करावीशी वाटते की आयुष्यभर ज्या बैलांनी आपल्याला साथ दिली त्या राज्याला म्हातारपणी आपण आपल्या स्वार्था साठी त्यांना कत्तलखानी पाठवतो, त्यांना विकतो. हा मोबदला देणे किती योग्य आहे याचा विचार नक्की केला पाहिजे…

ज्या प्रमाणे आपली आई आयुष्यभर आपल्या मुलाचा सांभाळकरून एका वया नंतर थकते, म्हातारी होते, तिच्या शरीरानी आता काही काम होत नाही, तर तिला आपण घरा बाहेर काढतो का? तिला कत्तलखानी पाठवतो का?? असा वेदनादायक प्रश्न इथे निर्माण होतो !!

म्हणून हे शेतकरी राजा….

या पोळ्या निमित्त पुरणाची पोळी नाही मिळाली तरी चालेल..

परंतु मी कत्तलखानी मरणार नाही याची हमी दे.. याची हमी दे.. हेच वचन म्हणजे माझे ऋण फेडले असे समजेल !!

बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img