
ब्रेव्हेट पॉप्युलेअर” मध्ये विनोद – प्रतापची विशेष कामगिरी
सायकलिंगमध्ये बाभूळगावच्या युवकांचा सहभाग
प्रतिनिधी । बाभुळगाव:-
नागपूर येथे नागपूर रँदोन्युअर्स व्दारा 9 मार्च रोजी आयोजित केलेल्या 300 किमीच्या नाईट ब्रेव्हेट आणि होळी विशेष 100 किमीच्या ब्रेव्हेट पाॅप्युलेअरमध्ये सर्व सायकल पटुंनी दिलेल्या वेळेत उदिष्ट साध्य केले. यामध्ये 100 किमीच्या ब्रेव्हेट पाॅप्युलेअरमध्ये बाभूळगाव येथील विनोद काळे व प्रतापसिंग यवतीकर या युवकांनी सहभाग घेवून हे अंतर पाच तास विस मिनिटांत पार करून ‘‘ ब्रेव्हेट’’ पुर्ण केले. या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी बाभूळगावचे नाव चमकविले आहे.
‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंमध्ये विनोदचा विशेष उल्लेख करावा लागेल. मित्राच्या आग्रहाखातर स्पर्धेत भाग घेणाऱ्या या सायकलपटूने आदल्या दिवशी नवीन सायकल खरेदी केली आणि दुसऱ्याच दिवशी यात तो सहभागी झाला. त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ होती. त्याने बालपणीचा मित्र आणि सहकारी सायकलस्वार प्रतापसिंग यवतीकर याच्यासोबत हे यश मिळवले. ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ सावनेरच्या पलीकडे दहा किलोमीटर अंतरावर उमरीपर्यंत आयोजित करण्यात आले. रवीवारी सकाळी सहा वाजता प्रतापनगरातील एनसायक्लोपिडीया येथून सुरू झालेला 100 किमी ‘ब्रेव्हेट’चा प्रवास दूपारी संपला. त्यासाठी साकयकलपटूंना साडेसात तासांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या दोघा बालमित्रांनी 100 किमी अंतराचे ब्रेव्हेटचे पाच तास वीस मिनिटात पूर्ण केले. एन्सायक्लोपिडियाचे स्वयंसेवक समाधान उन्हाळे यांनी प्रवासात सायकलपटूंना सहकार्य केले. विशेष म्हणजे विनोद काळे हा फोटोग्राफर असून त्याचा बाभूळगाव येथे स्टुडीओ आहे. तर प्रतापसिंग यवतीकर हा नागपूर येथे अग्निशमन दलात कार्यरत आहे. सायकलिंगची आवड असल्याने प्रतापने विनोदला नागपूरला बोलावून घेतले. व त्यांनी या ब्रेव्हेटमध्ये सहभाग घेतला. कठीण परिश्रम व जिद्दीच्या भरोशावर आज त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.