
भरपावसात शेकडो महिला कर्मचा-यांची तहसीलवर धडक
…. घोषणाबाजी करीत विविध मागण्याचे दिले निवेदन….
प्रतिनिधी । बाभुळगाव
शालेय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी, मदतनीस आशा व गट प्रवर्तक सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याबाबत सूचना व मागण्यांचे निवेदन घेऊन दिनांक ९ जुलै रोजी संघटनेच्या शेकडो महिला कर्मचारी भर पावसात तहसील कार्यालयात धडकल्या. यावेळी विविध मागण्याची घोषणाबाजी करीत त्यांनी निदर्शने केली. यावेळी आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना बाभूळगावच्या वतीने तहसीलदार मीरा पागोरे यांना निवेदन देण्यात आले.
देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ याच्या अखिल भारतीय संयुक्त मंचच्या वतीने दि.९ जुलै रोजी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला . महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी कृत्ती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला होता. या दिवशी सर्व स्वयंपाकी व मदतनीस पोषण आहार शिजविण्याचे व कुठलेही शाळेत काम केले करणार नाहीत,संपात सहभागी राहील,सर्व प्रकारचे कामकाज बंद राहील तसेच देश व राज्यभरातील शोलय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी, मदतनीस, आशा व गट प्रवर्तक धरणे, निदर्शन, मोर्चा, इत्यादी आंदोलनाव्दारे आपल्या न्याय मागण्या करतील असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सदरच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात श्याम बोबडे,शाहिस्ता खान,रुबिना शेख,रईसा नबी,प्रेमीला उइके, ममता सदाफळे, ज्योती भूराने, वैशाली चेंडकापुरे, मीना खांडेकर, बबिता पेंदोर, उज्वला जुमानके,पूनम परचाके,नानीबाई जीवतोडे, पूजा धरणे,संगीता ब्राह्मणकर,कांता पारधी, सुरय्याबी पठाण,सारिका कबाडे,संध्या झांबुळे, शालू चुटे,सीमा देठे,माया पोटजावरे,अश्विनी आंबेडकर,शारदा रामटेके,माया मेश्राम,अनिता दातार, लतिका तिजारे,नंदा पारिसे,वैशाली पारसोडे,राजू फाले,मनिषा फाले,जयवंती गाडेकर यांचेसह अनेक महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
मोर्चातील महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या.
शालेय पोषण आहार कर्मचारी या ना दरमहा किमान वेतन एकत्रीत रू. २६ हजार एवढे मानधन अथवा वेतन द्या, महाराष्ट्र सरकारने शालेय पोषण आहार कर्मचारी (स्वयंपाकी व मदतनीस), यांना दरमहा रु.१००० रुपये मानधन वाढ देण्याचे कबूल केले, त्याचा शासन निर्णय त्वरीत काढण्यात यावा. मानधन दरमहिन्याला द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा,त्याना कामानिमित्त रजा मंजूर करा व बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्याची मागणी करू नका, पर्यायी व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव यांनी करावी,शाळेतील पटसंख्या कमी असल्यामुळे एकापेक्षा अधिक स्वयंपाकी मदतनीस कार्यरत असेल तर पूर्वीपासून काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस यांना कायम ठेवा, त्यांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार व्हावा, मदतनीस, स्वयंपाकी यांना गणवेश द्या,शालेय पोषण आहार कर्मचारी यांना कामावारून कमीकरण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती ऐवजी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात यावे, पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस याना दरवर्षी डॉक्टरचे फिटनेस प्रमाणपत्र मागणे बंद करावे व दरवर्षी करारनामा लिहून घेण्याची पध्दत बंद करावी, सेन्ट्रल किचन प्रणाली बंद करावी अश्या ९ मुख्य मागण्यांसह १४ इतर केंद्रीय समाईक मागण्याचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.