महागाव कसबा पोलीस चौकीमध्ये नवीन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
महागाव कसबा । प्रतिनिधी.
लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी महागाव कसबा येथे नवीन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न झाली
या नवीन कायदेविषयक कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल हिवरकर यांनी नवीन कायदा बदल मार्गदर्शन केले तसेच आधीच्या कायद्यामध्ये काही बदल करून नवीन कायदे कसे केले याबद्दल भरपूर मार्गदर्शन केले असून त्याबाबत महागाव पोलीस चौकीचे बीट जमादार प्रकाश रत्ने यांनी सुद्धा नवीन कायद्याबद्दल नागरिकांना माहिती दिली या कार्यशाळेचे अध्यक्ष श्री किशोर बिहाडे सरपंच ग्रामपंचायत महागाव कसबा हे होते तर कार्यशाळेला गावातील तंटामुक्ती अध्यक्ष संजय जयस्वाल दीपक लाड ग्रामपंचायत सदस्य गफ्फार भाई बंडू वगारे वैभव दुधे खुशाल आडे धर्मराज चव्हाण कासम भाई किशोर काकस आरिफ मलनस शकील दुंगे चंद्रभानजी खुरसडे पुंडलिक चतुर गणेश राठोड शे.छोटु व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते
प्रकाश रत्ने बीट जमादार पोलीस चौकी महागाव कसबा यांनी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन केले.