महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेची विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीय पदधिकारी नियुक्त
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । यवतमाळ:
येथील विश्राम भवन मध्ये दि. ०६ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेची संवाद बैठक घेण्यात आली. कलाल-कलार समाजाचे सर्व शाखेय तथा महाराष्ट्रामधील सर्व प्रांतिय कलाल- कलार हे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संघटन आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर समुद्रवार यांनी सहत्रबाहू अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरीता शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत तसेच समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच विशेष निमंत्रीत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपा ओबीसी मोर्चाचे पश्चिम विदर्भ प्रमुख राजेंद्र डांगे, काँग्रेसचे नेता संतोष बोरेले, सुनील समदुरकर यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष रविन्द्र हटवार तसेच निमंत्रीत दिपक उके, किशोर कावरे, भास्कर झगेकार, रवि राऊत व सतीष मानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये यवतमाळ जिल्हा आणि विदर्भस्तरीय पदाधिकारींची निवड करण्यात आली. यामध्ये गणेश नाईक यांची सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच विनायकराव कावरे राज्य कार्यकारीणी सदस्य पदी सुधाकर उके जिल्हा संघटक पदी उपाध्यक्ष पदी नितिन मेश्राम महिलांमध्ये छाया जितेन्द्र उके यांना महिला जिल्हाध्यक्ष पदी, सुषमा विनोद मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष रजनी संजय शेंडे, तसेच नितीनकुमार उके यांची शहर अध्यक्ष तालुका अध्यक्षपदी सुधाकर कावळे, प्रसिध्दी प्रमुख म्हणून सचिन विनायकराव कावरे तर अशोक कावरे, सुरेश पटले यांची सल्लागार समिती पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संतोष मानकर व नितीन मेश्राम यांनी केले हाेते. उपस्थितांचे आभार मेश्राम यांनी मानले.
.
माणिकराव ठाकरे यांचेशी चर्चा
विश्रामगृह येथील सभा झाल्यानंतर कलाल-कलार समाजाच्या पदाधिकारींनी संतोष बोरेले यांच्या नेतृत्वात माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन ठाकरे यांना देण्यात आले. कलाल-कलार समाजाच्या मागण्या रास्त असून काँग्रेस सत्तेत आल्यास याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जाईल असे अाश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.