
मिटनापूर येथे खासदार चषक कबड्डी सामन्याचे थाटात उद्घाटन.
खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची उपस्थिती
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
जोशीला क्रीडा मंडळ मिटनापूर द्वारा आयोजित खासदार चषक अखिल भारतीय कबड्डीचे खुले सामन्याचे दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थाटात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार संजय देशमुख तर अध्यक्षस्थानी यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर विशेष करून उपस्थित होते. खासदार आपल्या तालुक्यातील जनतेच्या पाठीशी तन-मन-धनाने उभा असल्याची ग्वाही यावेळी आपल्या भाषणात खा. संजय देशमुख यांनी दिली.
यावेळी मंचकावर प्रमुख अतिथी म्हणून शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब धांडदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश गुल्हाने, उपसभापती डॉ. रमेश महानूर, आशिष सोळंके, गजानन काळे, राजू पांडे, श्याम जगताप, मोहन भोयर, मुकेश देशमुख, अतुल देशमुख, सागर धावणे, नरेंद्र कोंबे, एड. गजेंद्र कडूकार, विलास शेळके, सचिन माटोडे, शेख अयुब, विजय गेडाम, अब्दुल वहाब, योगेश घोडे, विलास कन्नाके, पंकज मसराम, किशोर चौधरी, निखिल शेळके, सागर राऊत, शेख अहमद, इमरान खान, सलमान खान, शाहरुख खान, कुणाल ठाकरे उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा ठाकरे यांनी केले. तर संचालन माधव नेरकर यांनी केले. यावेळी गावातील व परिसरातील शेकडो नागरिक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.