युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्यरत प्रशिक्षणार्थीच्या मागण्या पुर्ण कराव्या !
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ:-
मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनाच्या वतीने १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर ६ महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच त्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना कायम स्वरुपी करावे. तसेच नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायद्यानुसार किमान २००००/- वेतन / मानधन देण्यात यावे. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व मा. कौशल्यविकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे. वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.अश्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.