Homeधर्म / समाजरेझींग डे सप्ताह निमीत्य पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे कार्यक्रम

रेझींग डे सप्ताह निमीत्य पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे कार्यक्रम

रेझींग डे सप्ताह निमीत्य पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे कार्यक्रम

प्रतिनिधी | बाभूळगाव :-

पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे रेझींग डे सप्ताह निमीत्य ०३ जानेवारी रोजी ३.०० वा. कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय, बाभुळगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय, चिमनापुर येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षीका यांनी सहभाग नोंदविला. पोलीस स्टेशनला चालणाऱ्या कामकाजा बाबत, शस्त्राबाबत, सन २०२३ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, पोस्को कायदा, सायबर गुन्हे, वाहतुकीचे नियम व सुरक्षात्मक उपायाबाबत सविस्तर माहिती देवुन योग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम हा रेझींग डे सप्ताह निमीत्य असुन पोलीस अधिक्षक यवतमाळ,  कुमार चिंता,  अपर पोलीस अधिक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाभुळगाव येथील पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे  यांचे वतीने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमाला १०० ते १५० विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक वृंद व पोलीस अधिकारी, कर्मचारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img