Homeराजकीयलोकसभेत उरलेली कसर विधानसभेत भरून काढा - डॉ. कन्हैया कुमार.

लोकसभेत उरलेली कसर विधानसभेत भरून काढा – डॉ. कन्हैया कुमार.

लोकसभेत उरलेली कसर विधानसभेत भरून काढा – डॉ. कन्हैया कुमार.

बाभुळगाव येथे महाविकास आघाडीची भरगच्च प्रचारसभेचे आयोजन.

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव

काँग्रेसमुक्त भारतचा नारा हा भाजपचा अहंकार होता.हा अहंकार मतदार संघातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत मोडून काढला.यातील उरलेली कसर आता विधानसभेला या भागातील मतदार भरून काढा,असे आवाहन डॉ.कन्हैय्या कुमार यांनी उपस्थितांना केले.यावेळी ते बाभुळगाव येथील स्थानिक घोडूभाई मैदानावर दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करीत होते.

   यावेळी व्यासपीठावर खासदार संजय देशमुख,उमेदवार प्रा. वसंतराव पुरके, अशोकराव घारफळकर,भिमसिंगजी सोळंकी,प्रवीण देशमुख,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल मानकर,शिवसेना जिल्हा प्रमुख ( उ.बा.ठा) किशोर इंगळे,आमदार राजेशकुमार रेड्डी, कृष्णा कडू ,अतुल देशमुख ,मोहन बनकर, डॉ रमेश माहनुर, प्रकाश छाजेड, नितीन राठोड,अरुण राऊत,सौ.वर्षाताई निकम, ॲड सीमाताई तेलंग,अरविंद वाढोणकर,कृष्णा रंगारी, आभाताई परोपटे, आदीसह अनेक स्थानिक घटक पक्षातील नेते उपस्थित होते.

      पुढे बोलतांना म्हणाले महविकास आघाडी कडून सत्ते नंतर ५ सुत्री विकास निती रबविनार आहोत.यात महिलांना ३००० प्रतीमाह ,शेतकऱ्याचे कर्ज माफ,२५ लाखाचा आरोग्य विमा,बेरोजगारांना ४ हजार प्रतीमाह,जातीनिहाय गणना करून ५० आरक्षण मर्यादा हटवणार याचा समावेश असणार आहे.सोबतच उपस्थित खासदार संजय देशमुख यांनी विद्यमान सरकार वर ताशेरे ओढले.कापसाला भाव नाही,सरकार शेतकरी विरोधी आहे,यांचे काळात गुंडागर्दी वाढली आहे,पीक विम्याचा फायदा केवळ बड्या कंपन्याचा करून देत आहे.याशिवाय बाभुळगाव तालुक्यासाठी २२० के वी क्षमतेचे ऊर्जा केंद्र उभारून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

वीस वर्षा नंतर हेलिकॉप्टर उतरले शहरात

 सन २००४ मध्ये मतदार संघाची फेर रचना होण्या पूर्वी बाभुळगाव शहरात लालूप्रसाद यादव,प्रमोद महाजन,रामविलास पासवान या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या.त्यावेळी या नेत्यांनी आपापल्या हेलिकॉप्टरने शहरात आगमन झाले होते. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी २०२४ मध्येच हेलिकॉप्टरच्या आगमनाने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.तसेच गुरुवार आठवडी बाजार असल्याने त्या अनुषंगाने तालुक्यातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.1

  1. ↩︎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img