
वायूच्या वेगाने सत्कर्म करणारा म्हणजे युवा होय… प्रीतम सोनवणे
राष्ट्रीय युवादिनी महापुरूषांना अभिवादन.
प्रतिनिधी । बाभुळगाव
युवा म्हणजे कोण तर, वायूच्या वेगाने व सकारात्मक विचाराने जो सत्कर्म करतो तो खरा युवा होय, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख व मर्दानी खेळ प्रशिक्षक प्रितम सोनवणे यांनी केले. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून संबोधन करीत होते. राष्ट्रीय सवयंसेवक संघ बाभुळगाव तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी विभाग तसेच मर्दानी खेळ असोशियेशन यवतमाळ यांच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मानवता मंदिर बाभुळगाव येथे राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मर्दानी खेळ असोशियेशनचे अध्यक्ष मयुरेश शर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून रा.स्व.संघ जिल्हा पदाधिकारी हेमंत बोरकर व पांडुरंग मोने, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण लांजेकर, मंगलाताई फुसे, आकाश अर्जुने, योगेश वानोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची महती युवा खेळाडूंना सांगितली. कार्यक्रमांचे संचालन व आभार प्रदर्शन तिलक डोमडे यांनी केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी खेळाडू जागृती लांजेकर, वंशीका नवरंग, जान्हवी घ्यारें, ओम गुल्हाने, स्वर्णेश रोकडे, मंथन वर्मा, कार्तिक घ्यारे, दादू रोम, ओम चव्हाण, जय चव्हाण, सोहम अमृतकर, शंतनु फुसे, रोहित टाके आदिनी परिश्रम घेतले.