विदर्भ स्तरीय टॅलेंट आयकॉन शोमध्ये आगम तातेडची दमदार कामगिरी.
दिव्य दृष्टी वृत्तसेवा:
विदर्भ स्तरीय टॅलेंट आयकॉन शो २०२४ नुकतेच नागपूर येथील कविवर्य सुरेश भट हाॅल येथे पार पडले. यवतमाळ येथील नवदीन एज्युकेशन च्या विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्यात असलेले कला गुण कला आविष्कारातून सादर करून आम्ही कुणापेक्षा कमी नाही हे सिद्ध केले.यात बाभूळगाव येथील आगम तातेड याने आपली कुवत पणाला लावून दमदार कामगिरी करत निवड फेरीच्या माध्यमातून रॅम्प वॉक शोच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
यात नृत्य प्रकारात वंश त्रिवेदी आणी सना शेख तर फॅशन शो रॅम्प वाॅक या प्रकारात आगम तातेडसह ह्रदया पाटील, राजवी देशमुख,त्रीषा पाटील,आर्शीया कलीवाले, साहील उरकुडे यांनी सहभाग घेऊन सादरीकरण केले.या कार्यक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध पुरस्कार प्राप्त केले.नवदीन एज्युकेशन च्या निर्देशिका तसनीम असद बाॅम्बेवाला व त्यांच्या चमुने विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घेतला. या कार्यक्रमासाठी डाॅ. निकीता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास नवदीन एज्युकेशन संस्थेच्या वतीने असद बाॅम्बेवाला, प्रिती बांगडे,तेजस्विनी गुरव,प्रियंका बांगडे, अनुराग, व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.