विद्यार्थ्यांनी नियमित व तंत्रशुद्ध सराव करावा – शुभम चांभारे.
….विडूळ नवी आबादी शाळेत ‘सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : उमरखेड । यवतमाळ
हस्ताक्षर हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो’ म्हणून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच हस्ताक्षरांना वळण देणे गरजेचे असते.त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी ‘सुंदर हस्ताक्षर कसे काढावे’ ह्याची मार्गदर्शन करणारी कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडुळ नवी आबादी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या ‘शुभमक्षर’ या कार्यशाळेत जवळपास शंभरावर विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ‘सुंदर हस्ताक्षरासाठी महागड्या साहित्यापेक्षा अक्षरांचा नियमित तंत्रशुद्ध सराव करा’ असे प्रतिपादन मार्गदर्शक शुभम चांभारे यांनी केले.
यावेळी सुंदर हस्ताक्षराचे शिक्षणातील व जिवनातील महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.सोबतच विद्यार्थ्यांना देवनागरी व इंग्रजी भाषेतील लीपी चिन्ह,अक्षरांचा वळणं व विविध आकार समुह यांचा प्रत्यक्ष सराव करुन घेतला. सरावादरम्यान कोणती पथ्ये पाळावीत.याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले.
शुभम गजानन चांभारे हे बाभुळगाव तालुक्यातील लोणी येथील रहिवासी आहेत. सध्या ते संस्कार पोद्दार लर्न स्कुल उमरखेड येथे मराठी शिक्षक म्हणून कार्यरत असुन अनोख्या लेखनशैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. आबादीतील विद्यार्थ्यांचे अक्षर लेखन सुधारावेत या हेतूने शाळेच्या वतिने ह्या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेनंतर सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना शुभम चांभारे व भावेष पटेल यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यशाळा तब्बल दोन तास चालली हे विशेष.सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कोंडबा झाटेसह सहायक शिक्षक नागेश मिराशे, सुवर्णा बाकडे व वर्षाराणी हिंगणे यांनी परीश्रम घेतले.या कार्यशाळेत सर्वच विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.तर पालकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आहे.