
संग्रहित छायाचित्र
वेणी येथे ग्रा.पं.चे ‘वाटर एटिएम’ कार्यान्वित
गावक-यांना मिळणार शुध्द व थंड पाणी
बाभूळगाव । प्रतिनिधी:-
तालुक्यातील ग्राम पंचायत वेणी कसबा येथे ग्राम पंचायतच्या माध्यमातून ‘वाटर एटिएम’ सयंत्र कार्यान्वित करण्यात आले. दि. 18 मार्च रोजी या जलशुध्दीकरण सयंत्राचे लोकार्पण करण्यात आले. हे सयंत्र ग्राम पंचायतच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून उभारण्यात आले असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात त्यासाठी 8 लाख 70 हजार 912 रूपयांची तरतुद करण्यात आली. आता हे सयंत्र नागरिकांच्या सेवेत दाखल झाले असुन नागरिकांना शुध्द व थंड पाणी मिळणार आहे.
गावातील नागरिकांना शुध्द व थंड पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण सयंत्र बसविण्यात आले असून हे ‘वाटर एटिएम’ नावाने कार्य करणार आहे. यामध्ये पाच रूपयाचे नाणे टाकल्यानंतर नागरिकांना 15 लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय या वाटर एटिएम साठी प्रिपेड स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले असून गावक-यांनी हे कार्ड विकत घ्यावे व त्यांना पाण्यासाठी कार्ड मशीनमध्ये स्वाईप करावे लागणार आहे. त्यामुळे चिल्लर पैशाची अडचण भासणार नाही. आता उन्हाळ्यात वेणी कसबा येथील नागरिकांना कमी पैशात शुध्द व थंड पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी सरपंच विलास मडावी, उपसरपंच हबिब बेग, सदस्य विलास मेश्राम, सचिन सहारे, अरूणा दरणे, रंजना नागतोडे, सुरेखा जाधव, वृंदा डंभारे, रंजना चौधरी, ग्राम सेवक चिचाटे, प्रभाकर आगलावे, पुरूषोत्तम चौधरी, विलास चौधरी, वाल्मिक वासेकर, दत्ता भटकर, विनोद चौधरी अहेमद शेख आदि उपस्थित होते.