Homeमहाराष्ट्रबाभुळगावशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी केली जनजागृती

शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी केली जनजागृती

शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी केली जनजागृती

— स्वच्छता हीच सेवा अंतर्गत स्व. माणिकराव पांडे विद्यालय, फाळेगाव येथे कार्यक्रम  

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा| बाभूळगाव :-       

स्व.माणिकराव पांडे विद्यालय ,फाळेगाव ता. बाभूळगाव,जि. यवतमाळ शाळेत स्वच्छता पंधरवाडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोंबर 2024 या कालावधीत साजरा करण्यात आला. या अभियानाचा मुख्य उद्देश आसपासचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे. यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक सहभागी करून घेणे हा आहे. यावर्षी स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली होती, याचा अर्थ स्वच्छता एक कार्य असून तो आपला स्वभाव आपले मूल्य झाले पाहिजे. “स्वच्छता हे काम नसून ही एक सेवा आहे “असे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री काळे यांनी सांगितले. .                         या अभियानाअंतर्गत शाळा, घर ,सभोवतालील परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छतेसाठी चांगल्या सवयी मुलांना लावणे गरजेचे आहे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले, स्वच्छते संबंधी जनजागृती संदेश शालेय परिसरात लावण्यात आले. ओला कचरा,सुका कचरा वेगवेगळ्या करणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली .

        केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक वर्गासाठी सफाई मित्र नियुक्त करण्यात आले. कचरा कचराकुंडीतच टाका असा संदेश रॅलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला. प्लॅस्टिक बंदी, श्रमदान , टाकाऊ पासून टिकाऊ बनविणे, शौचालय सफाई, कंपोस्ट खत खड्डा, शोष खड्डा निर्मिती असे विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आले.  1आक्टोंबर 2024 रोजी सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली व 2 ऑक्टोंबर ला गांधी जयंती निमित्त  संपूर्ण विद्यालयाची स्वच्छता करून स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला.या अभियानात शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री काळे , शिक्षक,राजेंद्र राऊत ,माधव घोडे, विजय भोयर ,अरुण ठाकरे, गजानन वाघाडे , शिक्षकेतर कर्मचारी,अनंत अलोने, पुरुषोत्तम सहारे ,राजू धांदे,तुकाराम सयाम इत्यादी शालेय कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेनेची विद्यार्थी , भारत स्काऊट गाईड विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img