शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थेविरोधत रुग्णसेवकांचे आमरण उपोषण.
१८ मागण्यांचे निवेदन केले सादर.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : ( यवतमाळ)
यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली असून स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वेळोवेळी अवगत करण्यात आले.तसेच रुग्णालयाच्या अधिष्ठातांना तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. तरीसुद्धा रुग्णालयाची स्थिती सुधारली नाही आणि या रुग्णालयामध्ये रुग्णांना संदर्भसेवा देण्यासाठी म्हणून कार्य करणाऱ्या रुग्णसेवकांना मात्र रुग्णालयामध्ये आडकाठी केली जात आहे. या विषयावर संतप्त रुग्णसेवकांनी काल दिनांक २३ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला आरंभ केला असून त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर मागण्या मान्य होई पर्यंत संघपाल बारसे हे आमरण उपोषणाला तर सुरज खोब्रागडे, कमलेश ग.बघेल,किशोर बाभूळकर, अमीर काजी (शेरा भाई), सचिन राठोड,ईश्वर एरके, राजू मदणकर, मनोज लुटे,मोबिन शेख, प्रद्युम्न जवळेकर, मनोज दातार,मनोज चांदेकर,प्रफुल्ल शंभरकर, अतीक शेख, मोबीन शेख, मनीषा तीरणकर, सोहेल काजी, गोपाल घोडमारे,आतिख शेख, ही रुग्णसेवक मंडळी त्यांच्यासह लाक्षणिक उपोषणाला बसलेली आहेत. मागण्या पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे संघपाल बारसे यांनी स्पष्ट केले.