शिवकाला खेळात जागृती लांजेकर प्रथम.
विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
क्रीडा व युवक सेवा संचलनालय , महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक २७ नोव्हेंबर रोजी नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे संपन्न झाल्या. यात आश्टेडू आखाडा स्पर्धा २०२४-२५ या स्पर्धेत प्रताप विद्यालय बाभूळगाव येथिल शाळेची विद्यार्थीनी जागृती लांजेकर हिने शिवकला व मर्दानीकला या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला व तिची विभाग स्तरावर नियुक्ती झाली.यापूर्वी सुद्धा जगृतीने अनेक स्पर्धेत प्रथम स्थान मिळविले असून त्यात जिल्हास्तरीय,विभागीय तसेच राज्यस्तरीय सपर्धांचा समावेश आहे.तसेच नुकतेच २०२४ मध्ये तिने रेफरी प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे.तिच्या यशाचे श्रेय ती शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती घोडे मॅडम क्रीडा शिक्षक शशिकांत कापसे सर तसेच तिचे आई वडिलांना देते.तसेच तिच्या संपूर्ण खेळ प्रशिक्षणात सिंहाचा वाटा असलेले प्रशिक्षक प्रितम सोनवणे सरांचे विशेष श्रेय असल्याचे सांगुन त्यांचे आभार व्यक्त केले.