
शिवसेनेची बाभूळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
समाजातील सर्व घटकांना समान संधी, उपजिहा प्रमुख सचिन महल्ले यांचे प्रतिपादन
बाभूळगाव | प्रतिनिधी :-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांपुर्वी शिवसेना (शिंदे गट) बाभुळगाव तालुक्यासाठी कार्यकारिणी गठित कर्नुअत आली. यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री ना . संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. समाजातील सर्व घटकांना समान संधी या निमित्ताने देण्यात आली असल्याचे मत उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपतालुका प्रमुख, महिला आघाडी प्रमुख तथा विभाग प्रमुख अशा स्वरूपात नियुक्त्या देण्यात आल्या.

शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी तालुका प्रमुख, संघटकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये स्वप्नील मुडे उप तालुका प्रमुख मादणी घारफळ सर्कल, चंद्रशेखर अर्जुने उपतालुका प्रमुख दाभा पहूर सर्कल, अनिस खैराती खा पठाण घारफळ विभाग प्रमुख, गणेश येळणे मादणी विभाग प्रमुख, मुन्ना खान दाभा विभाग प्रमुख, युवराज महानूर सावर विभाग प्रमुख, अपर्णा अजय लाकडे महिला आघाडी प्रमुख, लीना कवडे महिला तालुका समन्वयक, हलीमा कदीर शेख महिला तालुका संघटिका, कांता सहारे महिला शहर प्रमुख, शशिकला कोठेकर शहर संघटक, सविता साठवणे शहर समन्वयक यांचा समावेश आहे. यावेळी तालुका प्रमुख सुधीर कडुकार, संघटक राजेंद्र पांडे, डॉ. बबन बोंबले,शेख अय्युब, रमेश बहाड, शब्बीर खान,वसंत जाधव,प्रवीण चेंडकापुरे,सारंग दातारकर,मनोहर हिवरकर, चंद्रशेखर अलोने आदीसह तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.



