Homeधर्म / समाजसिद्धेश्वर शिव मंदिर येथे ‘श्री महावीर गोरक्षण’ नामकरण सोहळा

सिद्धेश्वर शिव मंदिर येथे ‘श्री महावीर गोरक्षण’ नामकरण सोहळा

सिद्धेश्वर शिव मंदिर येथे ‘श्री महावीर गोरक्षण’ नामकरण सोहळा

भागवत कथेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बाभूळगाव | प्रतिनिधी :-

श्री.सिद्धेश्वर शिव मंदिर शिवतीर्थ वाळवंटी तीर्थक्षेत्र सरुळ(ता. बाभुळगाव) येथील महाशिवरात्रि वार्षिक यात्रा महोत्सवात भागवत कथा ज्ञान यज्ञ पर्वाचा समारोप व श्री.महावीर गोरक्षणाचे नामकरण सोहळा महाशिवरात्रीच्या पर्वावर नुकताच संपन्न झाला. या पर्वामध्ये दीर्घ अनुभवी 83 वर्षीय ह.भ.प. प्रल्हादराव महाराज आसटकर यांचे अमृतवाणीतून भागवत प्रवचन झाले. प्रसंगी ह. भ. प. विनोद महाराज जाधव यांचे समारोपीय काल्याचे किर्तन झाले. श्री सिद्धेश्वर शिवमंदिर शिवतीर्थ तथा वाळवंटी तीर्थक्षेत्र सरूळच्या विश्वस्तांनी विजयलता सुभाषचंद्र आचलिया व परिवाराचे गोरक्षणासाठी भरभरून देणगी दिल्याबद्दल मनोमन कौतुक करून त्यांचे आभार मानले.

येथील विश्वस्तांनी संबंधित गोरक्षणाचे नामांतरास जी व्यक्ती 15 लाख रुपये देईल ,त्या व्यक्तीचे नाव या गोरक्षणास देण्यात येईल. असे जाहीर केले होते. परंतु कोणी एक व्यक्ती 15 लाख रुपये घ्या व माझे नाव या गोरक्षणास द्या, म्हणत कोणीही पुढे आले नाही. भगवान शिवाला कदाचित हे मान्य नसेल. मात्र आज पर्यंत भरभरून दान देणाऱ्या यवतमाळ येथील गो भक्त आचलिया परिवारातील विजय लता सुभाषचंद्र आचलिया ह्या पुढे आल्या व आम्ही 15 लाख रुपये देऊ, मात्र आमच्या परिवारातील कोणाही व्यक्तीचे नाव या गोरक्षणास राहणार नाही, तर श्री .महावीर गोरक्षण असे नाव द्यावे असा संकल्प केला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी नैसर्गिक शेतीचे प्रणेते-पद्मश्री सुभाष शर्मा, भाजपा राळेगाव विधानसभा प्रमुख- सतीश मानलवार, रा. स्व. संघ यवतमाळचे प्रसारक -प्रवीण वडनेरकर, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक चे माजी अध्यक्ष- अजय मुंदडा, धर्मशाळा महासंघ महाराष्ट्र व गोवाचे क्षेत्रीय अधिकारी -राजूभाऊ निवल, नगर सेवक अनिकेत पोहोकार, डॉ. अजाबराव डाखरे, मुकेश बाबू देशमुख, श्री .सिद्धेश्वर शिव मंदिर शिवतीर्थ वाळवंटी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सरूळचे अध्यक्ष -संदीप आचलिया आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी प्राचीन व जागृत शिवलिंगाचे दर्शन घेतले व गोरक्षण मधील गोधनाचे पूजन करून त्यांना पशुखाद्य (चारा)भरवून दर्शन घेतले. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे “श्री. महावीर गोरक्षण”च्या फलकाचे पूजन व अनावरण (नामकरण) केले. उपस्थित मान्यवरांचे गोरक्षण चे स्मृतीचिन्ह, गुलाब पुष्प, शाल श्रीफळ व माल्या अर्पण करून सत्कार करण्यात आला. भागवत प्रवक्ते ह .भ .प. प्रल्हादराव महाराज आसटकर यांचा सत्कार करण्यात आला. थोर व महान दाते विजयता सुभाष चंद्र आचलिया व परिवार यांनी मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर शिवमंदिर शिवतीर्थ वाळवंटी तीर्थक्षेत्र च्या विश्वस्तांना चार लाख रुपयाचा धनादेश समर्पित केला (15 लाख रुपयातील उर्वरित). तदनंतर विशेष कार्याबद्दल संस्कार कोटेचा, आनंद सोळंके, महावीर भन्साली, बजरंग दलाचे पदाधिकारी -सागर सोनवणे ,मयूर पिसे आदींचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विलास सोळंके यांनी केले. त्यांनी संस्थेच्या अद्याप पर्यंतच्या कारभाराविषयी व विकासात्मक दृष्टिकोनातून  तसेचभविष्यात गोरक्षण मधील जीवदयांचे पालन पोषणाकरिता परिसरातील शेतकरी दात्यांनी संस्थेला पशुखाद्य (चारा)तुरीचे कुटार, चना ,सोयाबीन गव्हांडा किंवा अन्य चारा देऊन जीवदयांचा आशीर्वाद घ्यावा व संस्थेला आधार करावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे मनोरंजक असे बहारदार व प्रभावी सूत्रसंचालन भाजपा यु मोचे तालुका अध्यक्ष-आनंद सोळंके यांनी केले. त्यांनी “मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है; पंखो से कुछ नही होता, हो सलो से उडान होती है! कंधो से कंधा लगाकर कदम से कदम मिलाकर हमे; अपनी जीवन यात्रा को लक्ष प्राप्ति के शिखर तक ले जाना है! छोटे मनसे कोई बडा नही होता; कुठे मनसे कोई खडा नही होता; क्या हार में क्या जीत में; किंचित नाही भयभीत मे; कर्तव्यपत पर जो भी मिला; यह भी सही वो भी सही; वरदान नही मांगूंगा ;हो कुछ पर हार नही मानूंगा! अशा शब्दोत्सवाने दानदाते आचलिया परिवाराचे स्वागत केले.

कार्यक्रमाला दानदाते -प्रेमचंद बोरा धरमचंद बोरा ,नेणीबाई आचलिया, योगिता तातेड ,सुशील कोटचा,सीमा कोटेचा, ललित बेगमुथा, शिल्पा बोरुंदिया संदीप तातेड ,भरत पिपरिया ,संतोष गादिया, कस्तुरचंद सेठिया, राजेंद्र गुगली या ,अभय बाबू गुगली या, पत्रकार प्रवीण लांजेकर, विक्रम बऱ्हाणपुरे, डॉ. प्रशांत झाडे, भास्कर थोटे ,अरुण ताजने, रवींद्र सोलंकी, कृष्णा ठाकरे, रूपाली कौतुके, किरण थोटे आदी गणमान्य व्यक्तीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वार्षिक महाशिवरात्री यात्रोत्सव भागवत कथा पर्वाची सांगता व महावीर गोरक्षण नामकरण आणि सत्कार सोहळ्याचा समारोप भव्य महाप्रसादाने झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img