सेवानिवृत्त शिक्षक अनिल महाजन यांना निरोप
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाभुळगाव येथील सहाय्यक शिक्षक अनिल महाजन यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सन्मान व सत्कार सोहळ्याचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी विद्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुभाषराव घोडे, प्रमुख अतिथी गोपाळराव खडसे ,जयंतराव घोंगे, प्रकाशचंद छाजेड, भारत इंगोले, राजू इंगोले, पद्माकर राऊत उषा महाजन, मुख्याध्यापिका स्वाती घोडे, उपमुख्याध्यापक राठोड सर, पर्यवेक्षक नगराळे सर, शशिकांत कापसे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक स्वाती घोडे मॅडम यांनी केले. यावेळी प्रताप शिक्षण मंडळ, प्रताप विद्यालय, प्रगतिशील प्रताप विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था बाभुळगाव यांच्या वतीने महाजन सर यांचा भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गजबे सर आणि आत्राम सर यांनी महाजन सर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत कापसे आणि ज्योती गिरी मॅडम यांनी केले. तर आभार आश्लेषा पवार मॅडम यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.