सोयाबीन आवक वाढल्याने बाजार समिती फुल्ल.
बाजार समितीच्या परिसरात वाहतूक कोंडी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभुळगाव.
बाभुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वीच सोयाबीन खरेदी सुरू झाली.दिवाळीच्या सुट्ट्या पूर्वी सोयाबीन चांगले भाव मिळाले.दिवाळी नंतर तब्बल १० दिवसानंतर पुन्हा बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू झाली.सोयाबीन मालाला चांगला भाव मिळत शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाभुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धाव घेत आहेत. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या बाभुळगाव बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून खरेदी बंद होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी शुक्रवारी दिनांक ८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे.
मंगळवारी बाजार समितीबाहेर यवतमाळ धामणगाव रोडवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. २० हजार पेक्षा जास्त कट्ट्याची विक्रमी आवक चालू हंगामात झाली असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात.दिवाळीच्या सुट्ट्यांनतर पहिल्याच दिवशी बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना व्यवहारातील देणी-घेणी व रब्बीच्या पूर्व तयारीसाठी मिळेल त्या भावात माल विकावा लागत आहे. एकंदरीत बाजार परिसर हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी आपल्या सवडीनुसार बाजार समितीमध्ये माल विक्रीकरिता आणावा, आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे प्रशासक विलास गायकवाड यांचे म्हणणे असून शेतकऱ्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच बाभुळगाव येथे दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार दरम्यान भाव दिला जातोय माहिती प्रशासकांनी दिली.