Homeमहाराष्ट्रबाभुळगावसोयाबीनला मिळाला उच्चांकी चार हजार नऊशे भाव !

सोयाबीनला मिळाला उच्चांकी चार हजार नऊशे भाव !

बाभूळगाव बाजार समितीत सोयाबीनने गाठला उच्चांक – चार हजार नऊशे भाव !

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :

दिवाळी सणाच्या अनुशंगाने शेतक-यांनी सोयाबीन बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्याचे पहावयास मिळाले. आता पर्यंत सोयाबीनला रू.3500/-पर्यंत बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत होते.  शनिवारी (26 आॅक्टोबर) सोयाबीनने हमी भावाला मागे टाकत उच्चांकी चार हजार नऊशे रूपयांचा भाव मिळविला आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी 1600 क्ंिवटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

                बाभूळगाव कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतक-यांच्या बाजूने सदैव उभी राहिली आहे. व्यापारी आणि शेतकरी यांच्या मधील दुवा म्हणून येथील संचालक सतत काम करीत असतात, असे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डाॅ. रमेश महानुर यांचेसह सर्व संचालक व सचिव यांनी सोयाबीनच्या भावाबाबत  व्यापा-यांशी सल्लामसलत करून त्यावर तोडगा काढण्यात यश मिळविले. त्याच प्रमाणे शेतक-यांनी सोयाबीन स्वच्छ करून व वाळवून बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले होते. शनिवारी  आर्द्रताच्या आधारावर सोयाबीन चार हजार रूपयापेक्षा कमी पासून ते चार हजार नऊशे या उच्चांकी भावापर्यंत पोहचले. सायंकाळ पर्यंत तब्बल 1600 क्ंिवटल आवक झाली. यामध्ये चार हजार रू.च्या खालील कास्तकार 29, चार हजार ते चार हजार पाचशे रू. पर्यंतचे कास्तकार 94, चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रू 37 अश्या एकुण 160 कास्तकारांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

दिवाळी नंतर बाजारभाव वाढण्याचे संकेेत ?

बाभूळगाव बाजार समितीमध्ये 26 तारखेचे बाजारभाव सोयाबीन 4000 ते 4900 रू., तीळ 10,000 ते 11,500 रू., तूर 8,900 ते 9000 रू., चना 5000 ते 6000 रू., गहू 2200 ते 2550 रू. या प्रमाणे राहिले. दिवाळी नंतर आणखी आवक वाढणार असून बाजारभावही वाढण्याची शक्यता असल्याचा सचिव विलास गायकवाड यांनी अंदाज व्यक्त केला. दिवाळी निमित्त सोमवार पासून पुढील आदेशापर्यंत बाजार समितीत खरेदी बंद राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

शासकीय खरेदीची शेतक-यांना प्रतीक्षा

सोयाबीनची शासकीय खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रीया सूरूच असून बाभूळगाव बाजार समितीमध्ये हजाराच्या वर शेतक-यांनी नांेदणी केली आहे. मात्र शासकीय खरेदीला अद्यापही सुरूवात करण्यात आली नाही. दिवाळी नंतर कापसाची सुद्धा आवक वाढणार असल्याने शासकीय खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img