स्पेक्ट्रम फाउंडेशनद्वारा जागतिक मृदा दिवस साजरा.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
बाभुळगाव तालुक्यात येरणगाव येथे दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य निर्मलाताई झोड,स्पेक्ट्रम फाउंडेशनचे पी.यू.व्यवस्थापक नरेश बाजरे मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर प्रास्ताविकातून नरेश बाजरे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.यात शेतकऱ्यांना जीवनासाठी माती अत्यावश्यक का आहे व ती आपल्याला अन्न, वस्त्र,निवारा आणि औषधी यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनाचा स्त्रोत असल्यामुळे मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे,शिवाय माती ही वेगवेगळ्या प्रमाणात खनिज, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनलेले असते. जीवनासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.माती हि वनस्पती वाढवण्यासाठी एक माध्यम आहे.अनेक कीटक आणि इतर जीवांचे घर आहे.तसेच माती कशा पद्धतीने वाचवता येईल यावर विस्तृत मार्गदर्शन केले. जंगलतोडीवर बंदी घालावी,वृक्ष लागवडीवर विशेष भर द्यावा, बांधकाम आणि खाणकामात मातीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे, शेताची नागरणी उत्तराच्या विरोधात करावी.तसेच माती प्रदूषण थांबवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा, बायोचारचा वापर, व कार्यक्रम स्थळावर असलेले रीजेनरेटिव अग्रिकल्चर डेमो प्लॉट चे वैशिष्ट इत्यादि बद्दल माहिती दिली.तसेच कार्यक्रमा दरम्यान शेतकरी बबनराव वानखडे यांचा शाल,श्रीफळ व वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रक्षेत्र अधिकारी लक्ष्मण येडस्कार यांनी केले.या कार्यक्रमाकरिता स्पेक्ट्रम फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी शुभम डफळे, वैभव मेघळ, हितेश भोयर,नागसेन सुटे,आनंद मांढरे,संदीप जगताप,वैभव इजपाडे,अंकुश न्हाने,कृषी सखी प्रियांका होटे यांचेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.