मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना खेलरत्न
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली यादी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ :
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर , फिडे विश्व बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश , भारतीय हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाने आज गुरुवारी ही घोषणा केली . या चारही खेळाडूंना 17 जानेवारी रोजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पियन प्रवीण कुमार,नेमबाज मनू भाकर , डी गुकेश यांना 17 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने 17 जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहिती जाहीर केली. अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. चार जणांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल, तर 32 जणांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.