-– चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील प्रकार सोशल मीडियावर व्हायरल*
दिव्यदृष्टी डिजीटल वृत्तसेवा :
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील एक विडिओ समाजमाध्यमात वायरलं झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हा विडिओ महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालय जीवतीचा आहे.जिथे बसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला हवे, त्याच टेबलावर जुगार खेळला जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टेबलवर कार्यालयातील प्रधानतंत्रज्ञ गंधारे आपल्या तीन मित्रांचा सोबतीने जुगार खेळत असल्याचे विडिओत दिसत आहे.जीवती तालुका अति मागास ,दुर्गम, डोंगराळ, व आदिवासी बहुल क्षेत्र असलेला तालुका आहे.जोराचा वारा आला की तालुक्यातील अनेक गावांची बत्तीगुल होते. दोन-तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो.जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जुगार खेळण्यात कर्मचारी दंग असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा,ही मागणी घेऊन कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. संतापलेल्या नागरिकाकडून कार्यालयाची तोडफोड सुद्धा झाली होती. मात्र नागरिकांच्या समस्यांशी या अधिकाऱ्यांना काहीच घेणे देणे नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.